
ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक, लेखक, शिक्षक, कवि मनाचे व्यासंगी संशोधक, रसिक, अभ्यासक, दलित चळवळीचे प्रणेते, राष्ट्रपती पुरस्कृत पद्मश्रीचे मानकरी डॉ. गंगाधर पानतावणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून सुरु झालेला अध्यापन आलेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागास प्रज्ञास्पर्श देऊन गेला. संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जागतिक स्थरावरील व्याख्यानांमधून साहित्य, समाज आणि संस्कृतीविषयी विचार संपृक्त आणि कणखर भूमिका घेतली. जीवनात विविध पदे भूषवली तरी एक सहृदय माणूस म्हणून समाजमनात स्थान मिळवले. अतुल्य अश्या साहित्य योगदानामुळे सॅन होजे येथे २००९ साली संपन्न झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय साहित्या संमेलनाच्या अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान प्राप्त झाला.
अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले पानतावणे सर यांना भारत सरकारने २०१७ साली पद्मश्री प्रदान करून गौरविले.
अस्मितादर्श

अस्मितादर्शला हवे आंबेडकरवादी साहित्य.
मुखवट्याचे साहित्य नको !
'अस्मितादर्श ' अंकाचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क:
प्रागतिक विचार संसदेचे 'अस्मितादर्श'
श्रावस्ती, मिलिंद महाविद्यालयासमोर, छावणी,
औरंगाबाद – ४३१००२
अस्मितादर्श साहित्य संमेलन

१९७४ पासून सातत्याने आयोजित झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनातून चळवळीच्या साहित्याचे दिशादर्शन झाले. अस्मितादर्श साहित्य संमेलने म्हणजे सांस्कृतिक परिवर्तनाच्या कार्यशाळा ठरल्या. आतापर्यंत ३५ अस्मितादर्श साहित्य संमेलने संपन्न झाली. अनेक नवलेखकांना प्रस्थापित साहित्यीक व विद्वानांसमक्ष आपले विचार व प्रतिमा अभिव्यक्त करण्याची संधी या संमेलनांमुळे प्राप्त झाली. तत्वचर्चा व तत्वबोधाचे सम्यक संस्कार या संमेलनांमधून महाराष्ट्राला प्राप्त होत राहिले व आहेत. अनेक श्रेष्ठ कृतीशील विचारवंतांनी आपले जीवनभाष्य व साहित्यभाष्य या संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांमधून व्यक्त केले.