डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे

Alternate Text

ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक, लेखक, शिक्षक, कवि मनाचे व्यासंगी संशोधक,रसिक, अभ्यासक, दलित चळवळीचे प्रणेते, राष्ट्रपती पुरस्कृत पद्मश्रीचे मानकरी डॉ. गंगाधर पानतावणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून सुरु झालेला अध्यापन आलेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागास प्रज्ञास्पर्श देऊन गेला. संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जागतिक स्थरावरील व्याख्यानांमधून साहित्य, समाज आणि संस्कृतीविषयी विचार संपृक्त आणि कणखर भूमिका घेतली. जीवनात विविध पदे भूषवली तरी एक सहृदय माणूस म्हणून समाजमनात स्थान मिळवले. अतुल्य अश्या साहित्य योगदानामुळे सॅन होजे येथे २००९ साली संपन्न झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय साहित्या संमेलनाच्या अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान प्राप्त झाला.

अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले पानतावणे सर यांना यांना भारत सरकारने २०१७ साली पद्मश्री प्रदान करून गौरविले.

परिचय